मुख्य आशयावर जाSkip to main content
मार्गदर्शन

सुरुवात कशी करावी?

डाउनलोड ते टायपिंग — पाच सोप्या चरणांमध्ये Marathi Lipi Professional वापरणे सुरू करा.

इन्स्टॉलर डाउनलोड करा

डाउनलोड पृष्ठावरून MarathiLipiSetup.exe डाउनलोड करा.

System Requirements: Windows 10 / 11 Pro, Education किंवा Enterprise — 64-bit (x64). Windows Home वर चालत नाही.

इन्स्टॉलर चालवा

MarathiLipiSetup.exe वर उजवे क्लिक करा → "Run as administrator" निवडा.

Wizard मध्ये पुढील चरण: Welcome → License → Activation → Install → Finish.

Windows SmartScreen ने "Unknown publisher" म्हटले तर "More info" → "Run anyway" क्लिक करा. कारण: code signing certificate — लवकरच उपलब्ध होईल.
Marathi Lipi installer — Welcome स्क्रीन Marathi Lipi installer — License स्क्रीन Marathi Lipi installer — Installation स्क्रीन

परवाना सक्रिय करा

Wizard च्या Activation पृष्ठावर तुमचा Email आणि License Key टाका (खरेदी केल्यानंतर ईमेलमधून मिळतो).

नंतर सक्रिय करायचे असल्यास "Activate Later" क्लिक करा — Start Menu → Marathi Lipi Activation वरून नंतर सक्रिय करता येईल.

परवाना सक्रियतेसाठी एकदा इंटरनेट आवश्यक आहे. त्यानंतर ऑफलाईन वापरता येतो.
Marathi Lipi Activation dialog — Email आणि License Key एंटर करा

Marathi Lipi कीबोर्ड निवडा

Taskbar मधील भाषा indicator (ENG) वर क्लिक करा → मराठी (Marathi Lipi Professional) निवडा.

किंवा: Win + Space दाबून कीबोर्ड बदलता येतो.

Windows Taskbar मध्ये Marathi Lipi Professional keyboard निवडा Windows Time & Language Settings — मराठी कीबोर्ड add करा

टायपिंग सुरू करा

तुमची Typewriter / ISM सवय वापरा — layout तीच आहे, आउटपुट आता शुद्ध Unicode.

⌨ Full keyboard layout आणि online practice →


वारंवार विचारले जाणारे प्रश्न

परवाना नवीन संगणकावर कसा हस्तांतरित करावा?

जुन्या संगणकावर: Start Menu → Marathi Lipi Deactivate चालवा. नंतर नवीन संगणकावर installer टाका आणि तोच Email + Key वापरून activate करा.

इंटरनेट नसेल तर कीबोर्ड काम करेल का?

होय. एकदा activate केल्यानंतर ऑफलाईन वापरता येतो. परवाना दैनंदिन तपासणी होते — पण network नसेल तर विद्यमान स्थिती कायम राहते.

Taskbar मध्ये "मराठी" दिसत नाही तर?

Settings → Time & Language → Language & region → मराठी (mr-IN) → Options → Marathi Lipi Professional keyboard आहे का ते पहा. नसल्यास installer पुन्हा चालवा.

Windows Home वर चालेल का?

नाही. Windows TSF (Text Services Framework) हे Pro, Education आणि Enterprise edition मध्येच पूर्णपणे उपलब्ध आहे.

अधिक मदत — Support → ⬇ डाउनलोड करा